| Welcome Visitor Login | Register Now | ||
| Home | Biography | Forts | Warriors | Articles | Gallery | Sources | Contribute | ||
|
नमस्कार मित्रहो, साधारण अडीच वर्षांपूर्वी शिवरायांची माहिती सर्वांना सुलभ रित्या कळावी, त्यांची कीर्ती विविध भाषांतून जगापर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने मी हे संकेतस्थळ सुरु केले होते. मी इतिहासाचा अभ्यासक नाही. तरीही महाराष्ट्रातील अभ्यासू मित्रांच्या, जेष्ठांच्या मदतीने अनेक किल्ले, महाराजांचे चरित्र, त्यांचे सहकारी, विवध लोकांनी काढलेली छायाचित्रे अशा गोष्टी जमवून ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न केला. आपल्यातील अनेक मित्रांनी मला फोन करून, इमेल पाठवून, किंवा नोंदणी करून ह्या संकेतस्थळावर प्रेम केलेत आणि माझ्या कामाला दाद दिलीत, माझा उत्साह वाढवलात. अगदी तंजावर, नागपूर, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणाहून लोकांनी मला संपर्क करून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. अनेकांनी हे संकेतस्थळ अधिकाधिक चांगले व्हावे ह्या उद्देशाने लेख, कात्रणे, छायाचित्रे असे सर्व देऊन हे संकेतस्थळ श्रीमंत केले. अनेकांनी सूचनाहि केल्या. आजवर माझ्या परीने मी तुमचे साहित्य संकेतस्थळावर पोहोचवण्याचे काम करत होतो. पण, वारंवार येणारे धमक्यांचे फोन, हा उल्लेख काढा नाहीतर धिंगाणा करू, घरात घुसून मारू, साईट बंद करा, हे काढलं नाही तर वाईट परिणाम होतील ईत्यादि गोष्टी आता सहन करण्यापलीकडे गेल्या आहेत. एखादी छान संध्याकाळ, तुम्ही अनुभवत असता आणि मधेच हे असे 'शिवप्रेमींचे' दूरध्वनी येतात. कायदेशीर कारवीच्या धमक्या मिळतात. ह्या सर्वांना कंटाळून हे संकेतस्थळ मी बंद करत आहे.तुम्ही आजवर जो पाठींबा दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. शेवटी हताशपणे इतकेच म्हणावेसे वाटते, महाराज तुम्ही मराठी माती एक केलीत पण आता ते होणे नाही, "कधी न व्हावे एकरूप हा शाप मराठी रक्ताला" हेच खरे. आपला नम्र, कौस्तुभ खरे email : kaustubhkhare@gmail.com |